सरकारच्या पाठींब्याने भारतात संगणकावर 500 हल्ले : गुगल

 जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत भारतात सरकारच्या पाठींब्याने संगणकावर हल्ले होत असल्याचा इशारा सुमारे 500 ग्राहकांना देण्यात आला होता. जगभरात हाच आकडा 12 हजार होता, असे गुगलच्या अहवालात म्हटले आहे. मात्र हे हल्ले देशातील व्यक्तींच्या संगणकावर झाले की परदेशातील याचे स्पष्टीकरण या अहवालात नाही.

रशीया आणि द. कोरीयामध्येही अशा स्वरूपाचे हल्ले होत होत आहेत, असे स्पष्ट करून गुगल अकाउंटचा पासवर्ड विचारताना हा हल्ला करण्यात येत असतो. इतरांच्या संगणकांवर हल्ला सरकारच्या पाठींब्याने करणाऱ्या 270 टोळ्या 50 देशांत कार्यरत आहेत. गुप्त महितीचे संकलन, बौध्दीक संपदेची चोरी, कार्यकर्ते आणि बंडखोरांना लक्ष्य बनवणे, अथवा सायबर हल्ले रोखणे किंवा चुकीची माहिती पसरवणे अशा उद्देशाने हल्ले करण्यात येत आहेत, असे गुगलचे शेन हंटले यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.

भारतीय लष्कराच्या कर्मचाऱ्यांच्या तुमच्या व्हॉट्‌स ऍप अकाउंटवर हल्ला पाकिस्तानी लषकराकडून होऊ शकतो, असा सतर्कतेचा संदेश नुकताच देण्यात आला होता.

News Reporter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *