गुगल पे वापरता? मग बातमी आपल्यासाठी!

सध्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. रोज नवीन पध्दतीने हॅकिंग केल्याच्या घटना समोर येत आहेत. नोएडा येथील एक महिला ऑनलाईन हॅकिंगची शिकार झाली. या महिलेच्या बँक खात्यातून ३ मिनिटांत एक लाख रुपये चोरी झाले आहेत. याची तक्रार या महिलेने पोलिसांत केली आहे.

गुगल सर्च मध्ये बनावट संपर्क क्रमांक होता

खाते क्रमांक आणि पिन नंबर न सांगता बँक खात्यातून पैसे काढण्याच्या या घटनेने स्मार्टफोनवरील ऑनलाइन पेमेंट आणि यूपीआय आधारित पेमेंट अ‍ॅप्सवर संशय उपस्थित केले जात आहेत. फसवणूक झालेल्या महिलेने दिल्लीतील गुरुद्वार बुक करण्यासाठी फोन केला होता. या महिलेने गुगल सर्च वरुन मिळालेल्या गुरुद्वारच्या त्याच नंबर वरती कॉल केला होता. त्या नंबरवरती फोन केला तेव्हा त्या महिलेचे ज्या व्यक्तीबरोबर बोलने झाले त्यांनी गुरुद्वारचे बुकींग ऑनलाईन झाले आहे. यासाठी तुम्हाला गुगल पे वरुन पेमेंट करावे लागणार आहे. तुम्हाला एक फॉर्म ऑनलाईन भरावा लागेल. नंतर एक लिंक पाठवली जाईल त्यावरुन तुमचे पाच रुपये कट होतील.

गुगल पे वरुन झाली फसवणूक

महिलेने त्या लिंकवर क्लिक करून ५ रुपये दिले आणि फसवणूक करणार्‍यास याची माहिती दिली. त्या व्यक्तीने महिलेला बुकिंग प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत फोन होल्डवर ठेवण्यास सांगितले. काही काळ फोन होल्डवर ठेवल्यानंतर महिलेला फोनवर संदेश येऊ लागले. घाईघाईने त्यांनी फोन ठेवला. आणि मेसेज तपासला. त्यांच्या खात्यातून अज्ञात खात्यात एकूण १ लाख रुपये ट्रान्सफर झाले होते. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे फसवणूक करणार्‍याने महिलेला यूपीआय आधारित गूगल पे वरून ५ रूपये भरण्यास सांगितले होते.

फोन पूर्ण क्लोन झाला

या महिलेने घाबरून माहिती बँकेत दिली आणि पोलिस आणि सायबर सेलकडे तक्रार दाखल केली. या सायबर सेलने महिलेला सांगितले की, फसवणूक करणार्‍याने फोन बंद ठेवून फोन क्लोन (एक डिव्हाईस दुसऱ्या डिव्हाईस जोडणे याला क्लोन म्हटले जाते.) केला होता. क्लोनिंगद्वारे, हॅकरला फोनवर पूर्ण ताबा मिळवला आणि अत्यंत चतुराईने १ लाख रुपये चोरले.

असे वाचाल फसवणुकीपासून

गुगल सर्च मध्ये दिलेल्या नंबरवरती विश्वास ठेवू नका हे नंबर कोणीही एडिट करु शकतात. हे थांबवण्यासाठी गुगल प्रयत्न करत आहे. हॅकर हुशारीने हा नंबर एडिट करतात आणि ज्यांना फोन करतात त्यांना शिकार बनवतात. गुगल सर्चमध्ये दिलेल्या नंबरवर अवलंबून राहू नका आणि कंपनीच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या कस्टमर केअर नंबरवर नेहमीच कॉल करा असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

थर्ड पार्टी अ‍ॅप डाउनलोड करू नका

लिंक पाठवून फसवणुकीच्या बाबतीत फसवणूक करणारे त्यांच्या पीडितांना टीम व्ह्यूअर किंवा ऐनीडेस्क सारख्या दूरस्थ प्रवेश अ‍ॅप्स इनस्टॉल करण्यास सांगतात. या अ‍ॅप्सद्वारे, फसवणूक करणारे त्यांच्या फोनमध्ये प्रवेश करण्यासाठी कुठूनही आणि त्यावरील प्रत्येकगोष्टीवर देखरेख ठेवतात आणि रेकॉर्ड करतात. महत्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही बँक आपल्या खातेदारांना कोणतेही ॲप डाउनलोड करण्याचा सल्ला देत नाही.

अँटी-स्पॅम फिल्टरचा वापर

ईमेल स्कॅमर्स पासवर्ड काढण्यासाठी नवीन मार्ग अवलंबत आहेत. ज्यात अँटी अँटी-स्पॅम फिल्टर अगदी नवीन आहे. याच्या मदतीने स्पॅमर्स सहजपणे वापरकर्त्याच्या ईनबॉक्सनध्ये प्रवेश करतात. या प्रकारचे ईमेल ओळख अवघड आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*